Maharashtra Corona Update : आज बरे झालेल्या रुग्णांपेक्षा बाधित रुग्णांची संख्या अधिक, 4,268 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून राज्यात दररोज वाढ होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. आज दिवसभरात राज्यात 4 हजार 268 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2 हजार 774 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 72 हजार 440 एवढी झाली आहे. त्यापैकी 17 लाख 49 हजार 973 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात सध्या 73 हजार 315 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 87 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आजवर राज्यात 48 हजार 059 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.57 टक्के एवढा आहे तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.46 टक्के झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 70 हजार 137 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी, 18 लाख 72 हजार 440 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 32 हजार 288 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 122 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.