Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,382 नवे रुग्ण तर, 66 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 4 हजार 382 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 54 हजार 553 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 2 हजार 570 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्यात आतापर्यंत 18 लाख 52 हजार 759 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 50 हजार 808 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिवसभरात राज्यात 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 49 हजार 852 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.55 टक्के एवढा आहे तर, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के एवढं झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.