Maharashtra Corona Update: राज्यभरात 44 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त, आज 3254 नव्या रुग्णांची नोंद

Maharashtra Corona Update: 44 thousand 517 patients corona free across the state, 3254 new patients registered today राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 94 हजार 041 इतका झाला आहे. पैकी सध्या 46 हजार 074 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत

एमपीसी न्यूज – राज्यात आज 1879 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 44 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. 

राज्यात आज कोरोनाच्या 3254 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 94 हजार 041 इतका झाला आहे. पैकी सध्या 46 हजार 074 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज झालेल्या 149 मृत्यूपैकी 66 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 18 एप्रिल ते 6 जून या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 83 मृत्यूपैकी मुंबई 58, ठाणे 9, नवी मुंबई 5, जळगाव 4, उल्हासनगर 3, वसई विरार 2 तर अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याती प्रत्येकी एकाच मृत्यू झाला.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 94 पुरुष तर 55 महिला आहेत. आज नोंद झालेल्या 149 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 87 रुग्ण आहेत तर 49 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 13 जण 40 वर्षांखालील आहे.

या 149 रुग्णांपैकी 104 जणांमध्ये (70 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 3438 झाली आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 93 हजार 784 नमुन्यांपैकी 94,041 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 69 हजार 145 व्यक्ती घरगुती अलगीकरणात  असून 27 हजार 228 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

… तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल
कोरोनाविरुद्धचा आपला संपलेला नाही तो सुरुच आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असंही उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.