Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,456 नवे कोरोना रुग्ण, 183 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज (बुधवारी) दिवसभरात 4 हजार 456 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 4 हजार 430 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा 51 हजार 078 वर जाऊन पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64 लाख 69 हजार 332 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 77 हजार 230 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 183 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 37 हजार 496 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97.03 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 41 लाख 54 हजार 890 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 90 हजार 427 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 071 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.