Maharashtra Corona Update : राज्यात 45,071 सक्रिय रुग्ण; आज 2,585 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 2 हजार 585 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली, तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्याच्या घडीला 45 हजार 71 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 26 हजार 399 एवढी झाली आहे. आज दिवसभरात 1 हजार 670 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आजवर एकूण रुग्णांपैकी 19 लाख 29 हजार 005 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 40 रुग्ण दगावले. आजवर 51 हजार 82 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.52 टक्के एवढा आहे तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.26 टक्के झाले आहे. राज्यात सध्या पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर व नागपूर या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.

आजवर करण्यात आलेल्या 1 कोटी 46 लाख 17 हजार 168 नमून्यांपैकी 20 लाख 26 हजार 399 नमूने सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 90 हजार 232 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 294 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.