Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,654 नवे कोरोना रुग्ण; 3,301 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज (शुक्रवारी) 4 हजार 654 नवे कोरोना रुग्ण सापडले. तर, 3 हजार 301 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा 51 हजार 574 वर जाऊन पोचली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 47 हजार 442 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 55 हजार 451 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 170 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 36 हजार 900 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97.02 टक्क्यांवर पोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 32 लाख 56 हजार 024 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 92 हजार 733 जण होम क्वारंटाईन आहेत. तर, 2 हजार 337 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.