Maharashtra Corona Update : राज्यात 48 हजार सक्रिय रुग्ण, आज 4,516 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात दररोज बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. आज दिवसभरात 4 हजार 516 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 2 हजार 294 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या 48 हजार 406 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 94 हजार 977 एवढी झाली आहे. त्यापैकी 18 लाख 94 हजार 839 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 48 हजार 406 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 523 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 50 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के एवढं झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या आत आली आहे. दररोज बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे सध्या 95 टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहचलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.