Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,831 नवे कोरोना रुग्ण, 4,455 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज (शनिवारी) 4 हजार 831 नवे कोरोना रुग्ण सापडले तर, 4 हजार 455 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 51 हजार 821 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 52 हजार 273 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 59 हजार 906 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 126 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 37 हजार 026 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.02 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 34 लाख 56 हजार 403 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 92 हजार 530 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 357 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.