Maharashtra Corona Update : राज्यात 49,796 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – आज राज्यात 3 हजार 075 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 3 हजार 056 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात सध्या 49 हजार 796 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 94 हजार 254 एवढी झाली असून, त्यापैकी 63 लाख 02 हजार 816 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.05 टक्के इतके आहे.

 

राज्यात आज 35 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजवर 1 लाख 38 हजार 096 रुग्ण दगावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 58 लाख 36 हजार 107 प्रयोगशाळा  नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 95 हजार 772 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 954 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.