Maharashtra Corona Update : राज्यात 5 लाख 54 हजार 711 कोरोनाबाधित झाले बरे

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 281 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 85 हजार 131 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – राज्यात आज 11 हजार 541 रुग्ण बरे झाले तर 16 हजार 867 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण 5 लाख 54 हजार 711 रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.58 टक्के झाले आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 281 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 1 लाख 85 हजार 131 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 328 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आज 328 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.15 टक्के एवढा आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 40 लाख 10 हजार 200 नमुन्यांपैकी 7 लाख 64 हजार 281 नमुने पॉझिटिव्ह (19.05 टक्के) आले आहेत.

राज्यात 13 लाख 12 हजार 059 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 524 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात दरदिवशी कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली विक्रमी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच आता केंद्राच्या मदतीशिवाय राज्यांना लॉकडाऊन जाहीर करणं शक्य होणार नसल्याने कोरोनाला रोखणार तरी कसं, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल.

तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.