Maharashtra Corona Update: आज 5,493 नव्या रुग्णांची भर, आतापर्यंत 86,575 जण झाले कोरोनामुक्त

Maharashtra Corona Update: 5,493 new patients added today, 86,575 released so far ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. विषाणू संसर्गबाधीत रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.

एमपीसी न्यूज- राज्यात आज 5493 नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचली आहे. यापैकी 86 हजार 575 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 2 हजार 330 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.59 टक्के एवढे आहे. राज्यात आज 156 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 60 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर उर्वरित 96 मृत्यू मागील कालावधीतील आहेत.

या मृत्यूंमध्ये मुंबईतील 64, ठाणे 24, जळगाव 6, जालना 1 आणि अमरावतीमधील एका मृत्यूचा समावेश आहे.

राज्यात आत्तापर्यंत 9 लाख 23 हजार 502 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 1 लाख 64 हजार 626 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.17.82 टक्के इतके हे प्रमाण आहे.

राज्यात सध्या 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात सध्या 5 लाख 70 हजार 475 लोक होम क्वॉरंटाइनमध्ये आहेत. तर 37 हजार 350 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णे वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.

त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महानगरपालिका क्षेत्रात कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

देशात व राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. राज्यावर कोरोनाचे संकट हे दूर झाले नाही. आपल्याला कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे. पण कोरोनाला स्वत:हून बळी पडू नका’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई : बाधित रुग्ण- 75,539, बरे झालेले रुग्ण- 43,154, मृत्यू- 4371, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 8, ॲक्टिव्ह रुग्ण- 28,006

ठाणे : बाधित रुग्ण- 34,257, बरे झालेले रुग्ण- 14,335, मृत्यू- 845, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 19,076

पालघर : बाधित रुग्ण- 5,267, बरे झालेले रुग्ण- 1,767, मृत्यू- 101, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3399

रायगड : बाधित रुग्ण- 3,669, बरे झालेले रुग्ण- 1,924, मृत्यू- 95, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,648

रत्नागिरी :  बाधित रुग्ण- 569, बरे झालेले रुग्ण- 423, मृत्यू- 26, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 120

सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण – 204, बरे झालेले रुग्ण- 151, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 49

पुणे : बाधित रुग्ण- 20,870, बरे झालेले रुग्ण- 10,708, मृत्यू- 714, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 9,448

सातारा :  बाधित रुग्ण- 1,004, बरे झालेले रुग्ण- 703, मृत्यू- 43, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 257

सांगली : बाधित रुग्ण- 347, बरे झालेले रुग्ण- 201, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 135

कोल्हापूर : बाधित रुग्ण- 824, बरे झालेले रुग्ण- 710, मृत्यू- 10, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 104

सोलापूर : बाधित रुग्ण- 2,588, बरे झालेले रुग्ण- 1,430, मृत्यू- 246, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 912

नाशिक : बाधित रुग्ण- 3902, बरे झालेले रुग्ण- 2,063, मृत्यू- 217, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1,622

अहमदनगर : बाधित रुग्ण- 399, बरे झालेले रुग्ण- 249, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 136

जळगाव : बाधित रुग्ण- 3,002, बरे झालेले रुग्ण- 1,793, मृत्यू- 220, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 989

नंदूरबार : बाधित रुग्ण- 166, बरे झालेले रुग्ण- 70, मृत्यू- 7, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 89

धुळे : बाधित रुग्ण- 962, बरे झालेले रुग्ण- 449, मृत्यू- 54, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 2, ॲक्टिव्ह रुग्ण- 457

औरंगाबाद : बाधित रुग्ण- 4,833, बरे झालेले रुग्ण- 2,222, मृत्यू- 227, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2,384

जालना : बाधित रुग्ण- 488, बरे झालेले रुग्ण- 313, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 161

बीड : बाधित रुग्ण- 112, बरे झालेले रुग्ण- 77, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0,ॲक्टिव्ह रुग्ण- 32

लातूर : बाधित रुग्ण- 303, बरे झालेले रुग्ण- 191, मृत्यू- 17, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 95

परभणी : बाधित रुग्ण- 92, बरे झालेले रुग्ण- 75, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 13

हिंगोली : बाधित रुग्ण- 262, बरे झालेले रुग्ण- 238, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 23

नांदेड : बाधित रुग्ण- 337, बरे झालेले रुग्ण 231, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 93

उस्मानाबाद : बाधित रुग्ण- 203, बरे झालेले रुग्ण- 161, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 33

अमरावती : बाधित रुग्ण- 528, बरे झालेले रुग्ण- 368, मृत्यू- 25, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण-135

अकोला : बाधित रुग्ण- 1,463, बरे झालेले रुग्ण- 869, मृत्यू- 73, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 1, ॲक्टिव्ह रुग्ण- 520

वाशिम : बाधित रुग्ण- 101, बरे झालेले रुग्ण- 61, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 37

बुलढाणा : बाधित रुग्ण- 213, बरे झालेले रुग्ण- 140, मृत्यू- 12, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 61

यवतमाळ : बाधित रुग्ण- 283, बरे झालेले रुग्ण- 186, मृत्यू- 10, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 87

नागपूर : बाधित रुग्ण- 1,421, बरे झालेले रुग्ण- 1,037, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 370

वर्धा : बाधित रुग्ण- 16, बरे झालेले रुग्ण- 11, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0 , ॲक्टिव्ह रुग्ण- 4

भंडारा : बाधित रुग्ण- (७९), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१)

गोंदिया : बाधित रुग्ण- 105, बरे झालेले रुग्ण- 102, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2

चंद्रपूर :  बाधित रुग्ण- 80, बरे झालेले रुग्ण- 54, मृत्यू- 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 26

गडचिरोली : बाधित रुग्ण- 64, बरे झालेले रुग्ण- 51, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 12

इतर राज्ये : बाधित रुग्ण- 74, बरे झालेले रुग्ण- 0, मृत्यू- 23, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 51

एकूण: बाधित रुग्ण-1,64,626, बरे झालेले रुग्ण- 86,575, मृत्यू- 7,429, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 15,ॲक्टिव्ह रुग्ण- 70,607

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.