Maharashtra Corona Update : राज्यातील 57 लाख रुग्ण कोरोनामुक्त, आज दहा हजार जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 57 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (शनिवारी) दिवसभरात 10 हजार 373 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95.76 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 8 हजार 912 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 59 लाख 63 हजार 420 एवढी झाली आहे. सध्या राज्यात आजघडीला राज्यात 1 लाख 32 हजार 597 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

राज्यात आज 257 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 17 हजार 356 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 93 लाख 12 हजार 920 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 8 लाख 06 हजार 506 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 698 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी अठरा हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, ठाण्यात 13 हजार तर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी दहा हजार सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.