Maharashtra Corona Update : राज्यात आज 5,760 नवे रुग्ण; 62 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शनिवारी 5 हजार 760 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर 62 रुग्णांचा मृत्यू झाला . यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 लाख 74 हजार 455 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सध्या 79 हजार 873 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 16 लाख 47 हजार 004 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 92.82 टक्के एवढा आहे.

 

राज्यात आज कोरोनामुक्त झालेल्या 4 हजार 088 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या 24 तासांत राज्यात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 46 हजार 573 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.62 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 20 हजार 470 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 17 लाख 74 हजार 455 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 22 हजार 819 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 569 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.