Maharashtra Corona Update: राज्यात आज 6,044 रुग्ण कोरोनामुक्त तर 9,431 नव्या बाधितांची नोंद

Maharashtra Corona Update: 6,044 corona-free patients and 9,431 new cases registered in the state today राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3,75,799 वर गेली आहे. त्यापैकी 2,13,238 कोरोनामुक्त झाले आहेत.

एमपीसी न्यूज – रविवारी राज्यात 9,431 नवीन रुग्ण आढळले आहेत तर, 6,044 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आहे. आज 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातल्या मृत्यूचा आकडा 13,656 एवढा झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3,75,799 वर गेली आहे. त्यापैकी 2,13,238 कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1,48,601 रुग्णांवर (सक्रिय) उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.74 टक्के एवढे झाले आहे. राज्याचा सध्या मृत्युदर 3.63 टक्के एवढा आहे.

मुंबईत आज 1,101 रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,09,161 झाली आहे.

तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज 286 नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 17,738 एवढी झाली.

पुणे विभागातील 48,455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 84,455 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण 33,649 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 2,351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच 921 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 18,86,296 नमुन्यांपैकी 3,75,799 नमुने पॉझिटिव्ह 19.92 आले आहेत. राज्यात 9,08,420 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत.

सध्या 44,276 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज 267 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्युदर 3.63 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.