Maharashtra Corona Update : राज्यात आज 6,059 नवे रूग्ण, बाधितांची संख्या 16.45 लाखांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज‌ (रविवारी) 5 हजार 648 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 14‌ लाख 60 हजार 755 झाली आहे. राज्यात आज 6 हजार 059 नवे रुग्ण आढळून आलेत. 

 

राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 45 हजारांवर गेली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 88.8 वर गेला आहे. आज 112 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 40 हजार 486 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 86 लाख 08 हजार 928 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 45 हजार‌ 020 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 18 हजार 016 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 13 हजार 572 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.