Maharashtra Corona Update : राज्यात आज 63,309 नवे कोरोना रुग्ण, 985 मृत्यू 

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख चढताच आहे. आज दिवसभरात 63 हजार 309 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 लाख 73 हजार 394 वर जाऊन पोहोचली आहे. 

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 37 लाख 30 हजार 729 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट 83.40 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 6 लाख 73 हजार 481 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

 

आज 985 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 67 हजार 214 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 42 लाख 03 हजार 547 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 31 हजार 159 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 65 लाख 27 हजार 862 नमूने तपासण्यात आले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील संचारबंदी आणखी पंधरा दिवस वाढवण्याबाबत एकमत झाले आहे. तसेच, राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस दिली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला असून एक तारखेपासून सुरू होणारे अठरा वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर पडणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.