Maharashtra Corona Update : राज्यात आज 6,397 नवे रुग्ण; 5,754 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 6 हजार 397 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 30 रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 5 हजार 754 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 93.94 टक्के झाला आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 लाख 61 हजार 467 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 30 हजार 458 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 5 हजार 754 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या राज्यात 77 हजार 618 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात राज्यात 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 52 हजार 184 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.42 टक्के एवढा आहे तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.94 टक्के झाले आहे.

राज्यात सध्या 3 लाख 43 हजार 947 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 482 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 63 लाख 46 हजार 358 नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.