Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाखांवर, आज 1,701 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.‌ आज (शनिवारी) 1 हजार 701 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील आजवर कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 66 लाखांवर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 01 हजार 551 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 33 हजार 9190 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आज 1 हजार 781 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.46 टक्के एवढा झाला आहे.

राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 25 हजारांच्या खाली आली असून, सध्या 24 हजार 022 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 330 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 39 हजार 998 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 6 कोटी 17 लाख 62 हजार 963 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 926 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 95 हजार 603 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.