Maharashtra Corona Update : राज्यात आज 67,013 नवे रुग्ण ; 568 रूग्णांचा मृत्यू

एमपीसीन्यूज : राज्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली
जात आहे. आज दिवसभरात राज्यात 67 हजार 13 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 568 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर 1.53 टक्के इतका आहे.

आज 62 हजार 298  रुग्ण करोनातून बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण 33,30,747 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34  टक्के एवढे झाले आहे.

Maharashtra reports 67,013 new #COVID19 cases, 62,298 recoveries and 568 deaths in the last 24 hours

_MPC_DIR_MPU_II

Total cases: 40,94,840
Active cases: 6,99,858
Total recoveries: 33,30,747 pic.twitter.com/TcOkDzEvm4

— ANI (@ANI) April 22, 2021

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,48,95,986 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 40,94,840   नमुने पॉझिटिव्ह आले.  सध्या राज्यात39,71,917 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये,  तर 29,014 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण 6,99,858 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.