Maharashtra Corona Update : राज्यात 6,857 नवे रुग्ण, 6,105 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी) 6 हजार 857 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 6 हजार 105 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या 82 हजार 545 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 82 हजार 914 एवढी झाली आहे. त्यापैकी 60 लाख 64 हजार 856 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
COVID19 | Maharashtra reports 6,857 new cases, 286 deaths, and 6,105 recoveries today pic.twitter.com/7QF1Hezuw9
— ANI (@ANI) July 28, 2021
महाराष्ट्रात आज 286 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 32 हजार 145 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. रिकव्हरी रेट 96.53 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 73 लाख 69 हजार 757 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 88 हजार 537 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 364 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.