Maharashtra Corona Update : राज्यात 76,755 ॲक्टिव्ह रुग्ण, आज 6,959 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) 6 हजार 959 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 467 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात सध्या 76 हजार 755 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 03 हजार 715 एवढी झाली आहे. त्यापैकी 60 लाख 90 हजार 786 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.61 टक्के एवढा झाला आहे.

महाराष्ट्रात आज 225 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 32 हजार 791 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 79 लाख 67 हजार 609 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 76 हजार 609 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 166 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.