Maharashtra Corona Update : राज्यात 80 हजार सक्रिय रुग्ण, आज 5,011 नव्या रुग्णांची वाढ

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज – राज्यात आज 5 हजार 011 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 6 हजार 608 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, राज्यात सध्या 80 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आज नव्याने वाढ झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाख 57 हजार 520 एवढी झाली आहे. त्यापैकी 16 लाख 30 हजार 111 रुग्ण बरे झाले आहेत तर, सध्या 80 हजार 221 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 46 हजार 202 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 92.75 टक्के एवढा आहे तर, मुत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 99 लाख 878 नमूने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 17 लाख 57 हजार 520 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 7 लाख 50 हजार 992 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 354 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.