Maharashtra Corona Update : राज्यात आज 832 नवे कोरोना रुग्ण, 841 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज (शनिवारी) 832 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 841 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 81 हजार 640 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.70 टक्के आहे.

राज्यात आज 33 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8 हजार 193 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.सध्या राज्यात 85 हजार 874 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 53 लाख 57 हजार 358 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 34 हजार 444 (10.15 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.