Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,430 जण कोरोनामुक्त तर, 6,738 नव्या रुग्णांची नोंद 

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.53 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आजही कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात 8 हजार 430 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.53 टक्क्यांवर पोहचले आहे. आज दिवसभरात राज्यात 6 हजार 430 नवे कोरोनाबाधित आढळले असून, 91 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,  राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16 लाख 60 हजार 766 वर पोहचली आहे. त्यापैकी 14  लाख 86 हजार 926 जण कोरोनामुक्त झाले असून 1 लाख 29 हजार 746 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 29 हजार 746 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 87 लाख 68 हजार 879 नमून्यांपैकी 16 लाख 60 हजार 766 नमूने (18.94 टक्के) पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीस राज्यात 25 लाख 28 हजार 544 जण गृह विलगीकरणात आहेत. तर 12 हजार 988 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

कोविशिल्ड’ लशीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते असे पुणेस्थित सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना हि माहिती दिली. लशीच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असेल असे पूनावाला यांनी सांगितले. लसीचे दर अजून निश्चित झाले नसले तरी सानोफी-जीएसके आणि मॉर्डनापेक्षा सिरम इन्स्टिट्यूटच्या लशीचे दर परवडणारे असतील, असे पूनावाला म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.