Maharashtra Corona Update : राज्यात 9.56 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 75 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज 19 हजार 476 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून आज 21 हजार 29 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 56 हजार 30 वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.65 टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या 2 लाख 73 हजार 477 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 लाख 9 हजार 787 नमुन्यांपैकी 12 लाख 63 हजार 799 नमुने पॉझिटिव्ह ( 20.69 टक्के) आले आहेत. राज्यात 18 लाख 75 हजार 424 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या 34 हजार 457 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 479 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.68 टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 479 मृत्यूंपैकी 251 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 127 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 101 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येनं पहिल्यांदा 2 हजाराचा आकडा ओलांडला आहे. तरी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या राज्यात सर्वात कमी आहे.

मात्र, गडचिरोली शहरात वाढलेल्या रुग्ण संख्या पाहाता प्रशासनानं ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली आहे. आजपासून जनता कर्फ्यूला सुरुवात झाली आहे.

अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स या कंपनीने नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. CDX-005 असं या लशीचं नाव आहे. या लशीत पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी आहे.

या लशीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून आता लवकरच क्लिनिल चाचण्या होणार आहेत. सीरम इन्स्टिट्युटला या लशीचं भारतात उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.