Maharashtra Corona Update : आज 9,164 जणांना डिस्चार्ज, कोरोनामुक्तांची संख्या 16 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – राज्यात आज 9 हजार 164 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 16 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.23 टक्के एवढा झाला आहे. 

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात राज्यात 4 हजार 907 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17 लाख 31 हजार 833 एवढी झाली आहे. त्यापैकी 15 लाख 97 हजार 255 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 88 हजार 070 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 125 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 45 हजार 560 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 96 लाख 328 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 17 लाख 31 हजार 833 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 9 लाख 41 हजार 118 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 551 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील कोविड-19 परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला. या दरम्यान महाराष्ट्र राज्याने कोविड नियंत्रणासाठी केलेल्या विविध उपाययोजना बाबत त्यांनी समाधान व्यक्त करत घेतलेल्या नाविण्यपूर्ण निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.