Maharashtra Corona Update : एक महिन्यानंतर राज्यातील रुग्णवाढ घटली; आज 26,616 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र आहे. तब्बल एक महिन्यानंतर राज्यातील रुग्णवाढ घटली असून, आज (सोमवारी, दि.17) दिवसभरात 26 हजार 616 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर आज 48 हजार 211 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 54 लाख 05 हजार 068 एवढी झाली आहे. त्यापैकी 48 लाख 74 हजार 582 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज राज्यात 516 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 82 हजार 486 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 90.19 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 13 लाख 38 हजार 407 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्याचा पॉझिटिव्हीटी रेट 17.25 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 33 लाख 74 हजार 258 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 28 हजार 102 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.