Maharashtra Corona Update : आज 5,965 नव्या रुग्णांची वाढ; 75 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शनिवारी 5 हजार 965 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्ण वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 14 हजार 515 एवढी झाली आहे. राज्यात सध्या 89 हजार 905 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 16 लाख 76 हजार 564 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज 3 हजार 937 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.4 टक्के एवढं आहे. राज्यात आतापर्यंत 46 हजार 986 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्यात मृत्यूदर 2.59 टक्के आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आतापर्यंत 1 कोटी 7 लाख 22 हजार 198 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 18 लाख 14 हजार 515 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 28 हजार 462 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 118 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध कोरोना लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी विविध केंद्रांना भेट दिली. त्यांनी सकाळी अहमदाबादजवळील झायडस कॅडिलाच्या केंद्रापासून त्यांनी सुरुवात केली. तेथून ते हैदराबाद येथील भारत बायोटेक याठिकाणी आले नंतर त्यांनी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट येथे आले. सिरमने अ‍ॅस्ट्रॅझेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी लसीसाठी भागीदारी केली आहे.

पंतप्रधानांनी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला म्हणाले, कोव्हिशिल्ड लशीच्या प्रगतीवर पंतप्रधान मोदी यांनी आज आनंद आणि समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like