Maharashtra Corona Update : पुन्हा चिंता वाढवणारी रुग्ण वाढ, दिवसभरात तब्बल 39,544 रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना रुग्णांची वाढ काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यासह एकूण रुग्णांची संख्या 28 लाख 12 हजार 980 वर जाऊन पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 24 लाख 727 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 23 हजार 600 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के एवढं झाले आहे. राज्यात सध्या राज्यात 3 लाख 56 हजार 243 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 227 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 54 हजार 649 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 17 लाख 29 हजार 816 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 17 हजार 863 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 97 लाख 92 हजार 143 नमूने तपासण्यात आले आहेत.

देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत दहा जिल्ह्यात आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर, या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. पुण्यात सर्वाधिक 64 हजार 277 सक्रिय रुग्ण आहेत त्यानंतर मुंबईत 49 हजार 953 तर, नागपूर मध्ये 46 हजार 333 सक्रिय रुग्ण आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.