Maharashtra Corona Update: मोठी बातमी! राज्यात एक लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित

Maharashtra Corona Update: Big News! More than one lakh corona affected in the state

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांच्या संख्येत चीनला मागे टाकल्यानंतर दोनच दिवसांत आज (शुक्रवारी) महाराष्ट्र राज्याने कोरोनाबाधितांच्या संख्येचा एक लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या आकड्यांनी महाराष्ट्रातील जनतेची चिंता वाढली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रात्री ट्वीट करून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाखांच्या पुढे गेल्याची माहिती दिली.

राज्यात आज नवीन 3493 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 1 लाख 01 हजार 141 अशी झाली आहे. आज नवीन 1,718 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 47 हजार 796 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 49 हजार 616 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

राज्यात आज 127 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 717 वर पोहचला आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.