Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील जवळपास 90 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

एमपीसी न्यूज – राज्यात आज (गुरुवारी) 7,883 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आज राज्यात 5,902 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. राज्यात आजपर्यंत एकूण 14 लाख 94 हजार 809 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.69 टक्के एवढे झाले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.  राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 88 लाख 27 हजार 133 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 66 हजार 668 (18.86 टक्के) नमुन्यांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात आज 156 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा 43 हजार 710 वर जाऊन पोहचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.62 टक्के आहे.

राज्यात एकूण 1 लाख 27 हजार 603 सक्रिय रुग्ण आहेत.

सध्या राज्यात 25 लाख 33 हजार 687 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 12 हजार 690 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.