Maharashtra Corona Update : दिलासादायक ! महाराष्ट्रातील 60 लाख रुग्ण कोरोनामुक्त

रिकव्हरी रेट 96.32 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 60 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रिकव्हरी रेट 96.32 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज 6 हजार 910 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 510 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 29 हजार 596 एवढी झाली आहे.

 

महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाहून कमी झाली असून, सध्या 94 हजार 593 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आज 147 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 30 हजार 753 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्के एवढा झाला आहे.

 

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 58 लाख 46 हजार 165 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 60 हजार 354 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 977 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.