Maharashtra Corona Update : दिलासादायक ! राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा तिप्पट रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – राज्यात आज नव्याने वाढ झालेल्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या तिप्पट आहे. आज राज्यात 5 हजार 984 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर, 15 हजार 069 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( रिकव्हरी रेट) 86.48 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 16 लाख 01 हजार 365 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 73 हजार 759 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर तब्बल 13 लाख 84 हजार 879 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज दिवसभरात 125 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 42 हजार 240 रुग्ण दगावले आहेत. राज्यातील कोरोना मृत्यूदर 2.64 टक्के एवढा झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 81 लाख 85 हजार 778 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 1 हजार 365 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24 लाख 14 हजार 577 जण होम क्वारंटाइन आहेत तर 23 हजार 285 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत असताना आज अवघ्या 5 हजार 984 रुग्णांची वाढ झाली तर, 125 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यासाठी हि दिलासादायक बाब असून संसर्गाचे प्रमाण मंदावले असल्याचं दिसून येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.