Maharashtra Corona Update : कोरोना मृतांची संख्या एक लाख पार, आज 233 मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज (रविवारी) एक लाखांचा टप्पा पार केला. आज दिवसभरात महाराष्ट्रात 233 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर एक लाख 130 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.72 टक्के एवढा आहे.

राज्यात नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट कायम असून आज दिवसभरात 12 हजार 557 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 58 लाख 31 हजार 781 इतका झाला आहे. त्यापैकी 55 लाख 43 हजार 267 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात आज 14 हजार 433 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट देशाच्या रिकव्हरी रेट पेक्षा अधिक असून, तो 95.05 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 85 हजार 527 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोरोना राज्यात आतापर्यंत 3 कोटी 65 लाख 08 हजार 967 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 13 लाख 46 हजार 389 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 426 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.