Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा विळखा परत घट्ट होतोय, आज 6,112 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होताना दिसून येत आहे. दररोज नोंद होणा-या रूग्णांमध्ये कामालीची वाढ होत असून, आज दिवसभरात राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 44 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 87 हजार 632 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 89 हजार 963 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 2 हजार 159 बरे झालेल्या डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 95.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 44 हजार 765 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात राज्यात 44 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 51 हजार 713 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.48 टक्के एवढा आहे. आतापर्यंत केलेल्या 1 कोटी 55 लाख 88 हजार 324 नमूने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 लाख 87 हजार 632 नमूने सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 087 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1 हजार 588 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

गेल्या 24 तासांत मुंबईत 823, पुण्यात 535, अमरावती शहर 623 तर ग्रामीण 132 आणि नागपूर मध्ये 630 रुग्ण सापडले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 8 हजार 528 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 5 हजार 162 तर, ठाण्यात 5 हजार 226 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारच्या वतीने केलं जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.