शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Maharashtra Corona Update: कोरोनाचा उद्रेक! राज्यात आज 9,518 नवे रुग्ण; एकूण बाधितांची संख्या 3,10,455 वर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रामध्ये एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या 9,518 ने वाढली आहे. तर 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,10,455 वर पोहोचली आहे. पैकी एकूण 1,69,569 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्याच्या घडीला राज्यात एकूण 1,28,730 सक्रिय रुग्ण आहेत. आज 3,906 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आजही मुंबईला मागे टाकून पुण्यात सर्वाधिक रूग्ण वाढले. आज पुण्यात 1,812 तर मुंबईत 1,038 रूग्णसंख्या वाढली. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 1,01,388 एवढी आहे. यातले 71,685 रुग्ण बरे झाले आहेत.

तर सध्या 23,697 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज दिवसभरात कोरोनामुळे 64 मृत्यू झाले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,714 एवढी झाली आहे.

पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 54,624 एवढी झाली आहे. यात 33,648 हे सक्रिय रुग्ण आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 19,517 एवढी आहे. आत्तापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 1,359 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 15,64,129 नमुन्यांपैकी 3,10,455 नमुने पॉझिटिव्ह (19.85 टक्के) आले आहेत. राज्यात 7,54,370 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

सध्या 45,846 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 258 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.82 टक्के एवढा आहे.

spot_img
Latest news
Related news