Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा उद्रेक; आज 43,183 नवे रुग्ण, 249 मृत्यू

एमपीसीन्यूज : राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असून आज, गुरुवारी राज्यात 43,183 नवीन कोरोनाबाधित रुग्ण वाढले. तर 249 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर 1.92 टक्के आहे. सध्या राज्यात एकूण 3,66,533 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज 32,641 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 24,33,368 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  85.2 टक्के एवढे  आहे.

आजपर्यंत1,99,75,341 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 28,56,163 (14.30 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19,09,498 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. 18,432 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 3,66,533 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यभरात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. तरीही कोरोनाला प्रतिबंध होताना दिसत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.