Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होतोय, आज 23,179 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात दररोज नव्यांन वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. आज दिवसभरात राज्यात 23 हजार 179 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. 2021 वर्षातील ही उच्चांकी रुग्णवाढ आहे.

राज्यात प्रामुख्याने पुणे, मुंबई, नागपूर, जळगाव या जिल्ह्यात नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तेव्हा पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 लाख 70 हजार 507 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 63 हजार 391 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 9 हजार 138 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

नव्यानं वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. सध्या राज्यात राज्यात सध्या 1 लाख 52 हजार 760 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात सक्रिय रूग्णांची संख्या अधिक आहे.

राज्यात आज दिवसभरात 84 रुग्णांचा मृत्यू झाला. आजवर 53 हजार 080 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.24 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.07 टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत राज्यात 1 कोटी 78 लाख 35 हजार 495 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 23 लाख 70 हजार 507 सकारात्मक आले आहेत. राज्यात 6 लाख 71 हजार 620 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 738 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.