Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,501 बरे झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज; 2,498 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज 4 हजार 501 बरे झालेल्या रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात राज्यात 2 हजार 498 नवे रूग्णांची वाढ झाली. या वाढीसह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 22 हजार 048 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आत्तापर्यंत 18 लाख 14 हजार 449 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 57 हजार 159 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 94.40 टक्के एवढा आहे.

राज्यात आज 50 रूग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 2.56 टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 25 लाख 43 हजार 772 नमून्यांपैकी 19 लाख 22 हजार 048 नमूने सकारात्मक आले आहेत.

राज्यात सध्या 4 लाख 52 हजार 535 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 138 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.