22.2 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Maharashtra Corona Update : राज्यात आज 7332 रुग्णांना डिस्चार्ज; 6,269 नवीन रुग्णांची नोंद

spot_img
spot_img

एमपीसीन्यूज : राज्यात आज 6,269 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 7 हजार 332 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 60 लाख 29 हजार 817 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35टक्के आहे.

राज्यात आज 224 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 29 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्यात सध्या 93 हजार 479रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (31), हिंगोली (56), यवतमाळ (9), गोंदिया (58), गडचिरोली (81) या पाच जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 714 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 66,44, 448 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,58, 079 (13.42 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,27,754 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,621व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

spot_img
Latest news
Related news