Maharashtra Corona Update : राज्यात आज 8950 रुग्णांना डिस्चार्ज; 8172 नवे रुग्ण

एमपीसीन्यूज : राज्यात आज, शनिवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 8 हजार 950 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 8 हजार 172 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तसेच 124  कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली.

राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 74 हजार 594 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.28 टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 52 लाख 60 हजार 468  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 05 हजार 190  (13.71 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 77 हजार 615  व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये, तर 4 हजार 156 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 1 लाख 429  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.