Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 12,608 नवे रुग्ण 10,484 जण कोरोनामुक्त

During the day, 12,608 new patients and 10,484 coronas were released in the state

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात तब्बल 12 हजार 608 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून जवळपास 364 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज सुद्धा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात 10 हजार 484 जण कोरोनामुक्त झाले असून राज्यात आजवर 4 लाख 01 हजार 442 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 5 लाख 72 हजार 734 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 1 लाख 51 हजार 555 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आजवर राज्यातील 4 लाख 01 हजार 442 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 364 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील एकूण मृतांची संख्या 19 हजार 427 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून राज्याचा रिकव्हरी रेट 70.09 टक्के एवढा झाला आहे तर, राज्यातील मृत्यूची टक्केवारी 3.39 इतकी आहे.

 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 30 लाख 45 हजार 085 नमुन्यांपैकी 5 लाख 72 हजार 734 नमुने पॉझिटिव्ह (18.8 टक्के) आले आहेत.

राज्यात 10 लाख 32 हजार 105 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 37 हजार 386 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, रशियाने तयारकेलेल्या लशीवर भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जगातील सर्वात पहिली कोरोना लस तयार केली आहे. त्यामुळे लशीची प्रतीक्षा करणाऱ्या कित्येकांना आता आशेचा किरण दिसू लागला आहे.

रशियाने आपल्याला अनेक देशांनी या लशीच्या डोससाठी ऑर्डर दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भारतातही ही लस दिली जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.