Maharashtra Corona Update: सलग चौथ्या दिवशी 5 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ

आतापर्यंत एकूण 88 हजार 960 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 73 हजार 298 सक्रिय रुग्ण आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आज सलग चौथ्या दिवशी 5 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. आज राज्यात 5 हजार 257 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 1 लाख 69 हजार 883 इतकी झाली आहे. आज नवीन 2 हजार 385 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत एकूण 88 हजार 960 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 73 हजार 298 सक्रिय रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 181 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनच्या चिंता वाढल्या आहेत.

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात आज सलग चौथ्या दिवशी पाच हजारांहून अधिक लोकांना कोरोना संसर्ग झाला. परिणामी आतापर्यंत 1 लाख 69 हजार 883 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 73 हजार 298 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 9 लाख 43 हजार 485 नमुन्यांपैकी 1 लाख 69 हजार 883 (18 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 74 हजार 93 लोक होम क्लॉरंटाईनमध्ये आहेत तर 37 हजार 758 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 2 हजार 385 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.37 टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत 88 हजार 960 लोकांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.