Maharashtra Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी दहा हजारांहून कमी रुग्ण, मृतांची संख्या वाढली

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज मंगळवारी (दि.15) 9 हजार 350 कोरोना रुग्णांची नोंद झाली, सोमवारी राज्यात 8 हजार 129 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली होती. दुसरीकडे कालपेक्षा आज दिवसभरात झालेल्या मृतांची संख्या वाढली आहे‌.

महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 59 लाख 24 हजार 773 एवढी झाली आहे. त्यापैकी 56 लाख 69 हजार 179 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 15 हजार 176 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य विभागाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

आजघडीला राज्यात 1 लाख 38 हजार 361 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 388 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 14 हजार 154 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.93 टक्के एवढा आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95.69 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 3 कोटी 84 लाख 18 हजार 130 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 9 लाख 04 हजार 462 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 621 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.