Maharashtra Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात मागील दोन दिवसांपासून बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज (सोमवारी) 3 हजार 626 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 5 हजार 988 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पन्नास हजारांच्या खाली आली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 89 हजार 800 एवढी झाली असून, त्यापैकी 63 लाख 755 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.09 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज घडीला 47 हजार 695 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 37 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 37 हजार 811 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.