Maharashtra Corona Update: सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट

एमपीसी न्यूज – राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात आज 19 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले तर दिवसभरात 10 हजार 552 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 96 हजार 288 झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 15 लाख 54 हजार 389 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी 13 लाख 16 हजार 769 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.  त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 84.71 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

राज्यात आज 158 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 40 हजार 859 वर पोहचला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.63 टक्के आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.