Maharashtra Corona Update : वाढता वाढे ! राज्यात आज 4,787 नवे रुग्ण; 40 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात 4 हजार 787 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली, तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 76 हजार 093 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बरे झालेल्या 3 हजार 853 कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 19 लाख 85 हजार 261 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्याचा रिकव्हरी रेट 95.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 38 हजार 013 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात राज्यात 40 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 51 हजार 631 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे. आतापर्यंत केलेल्या 1 कोटी 54 लाख 550 हजार 268 नमूने तपासण्यात आले असून त्यापैकी 20 लाख 76 हजार 093 नमूने सकारात्मक आले आहेत.

राज्यात सध्या 1 लाख 95 हजार 704 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1 हजार 664 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.