Maharashtra Corona Update : रुग्णवाढ कायम ! आज राज्यात 58,993 नवे रुग्ण, 301 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना रुग्णवाढ कायम असून, आज, शुक्रवारी दिवसभरात राज्यात तब्बल 58 हजार 993 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 9 हजार 200 तर, पुण्यात 5 हजार 647 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32 लाख 88 हजार 540 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 26 लाख 95 हजार 148 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज 45 हजार 391 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.96 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात सध्या 5 लाख 34 हजार 603 नव्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 301 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 57 हजार 329 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत.

राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.74 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 26 लाख 95 हजार 065 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 24 हजार 157 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 16 लाख 31 हजार 258 नमूने तपासण्यात आले आहेत.

पुण्यात सर्वाधिक 1 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत 88 हजार 053, नागपूर मध्ये 63 हजार 36 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.