Maharashtra Corona Update: शनिवारी रुग्णवाढीचा उच्चांक! मृतांचा आकडाही 10 हजारांच्या पुढे!

Maharashtra Corona Update: Highest Rise in patients on Saturday! The death toll exceeds 10,000! राज्यातील 1 लाख 36 हजार 985 रुग्ण कोरोनामुक्त, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 55.55 टक्क्यांवर!

राज्यात 6 लाख 80 हजार 17 लोक होम क्वॉरंटाइन आहेत. तर 47 हजार 376 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत. आत्तापर्यंत 12 लाख 85 हजार 991 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी 2 लाख 46 हजार 600 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 55.55 टक्के इतके झाले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे महत्वाच्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या लॉकडाऊन लागू आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी याठिकाणी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.