Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,936 नवे रुग्ण, 50 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 2 हजार 936 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 लाख 74 हजार 488 एवढी झाली आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज दिवसभरात 3 हजार 282 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 18 लाख 71 हजार 270 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज घडीला राज्यात 51 हजार 892 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आजपर्यंत तब्बल 50 हजार 151 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज दिवसभरात 50 रुग्ण दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54 टक्के एवढा आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.77 टक्के एवढं झाले आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 35 लाख 734 नमूण्यांपैकी 19 लाख 74 हजार 488 नमूणे सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 27 हजार 876 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 388 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.